पेट्रोल-डिझेल एक पैशाने नाहीतर एक रुपयाने होणार स्वस्त

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

केरळ सरकारने शुक्रवारपासून म्हणजेच 1 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल हे एक पैशाने नाहीतर आता एक रुपयाने स्वस्त होणार आहे.

केरळ - केरळ सरकारने शुक्रवारपासून म्हणजेच 1 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल हे एक पैशाने नाहीतर आता एक रुपयाने स्वस्त होणार आहे.

असा निर्णय घेणारे केरळ हे पहिलेच राज्य आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यातील स्थानिक विक्री करानुसार बदलत असतात. त्यानुसार प्रत्येक राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात तफावत असते. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना 50 ते 60 पैशाने पेट्रोल स्वस्त होईल असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या वेबसाईटवर म्हटले होते. परंतु, आज मात्र केवळ 1 पैशाने पेट्रोल स्वस्त झाले आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या मुल्यावर्धित करांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळे राज्याने लावलेल्य कराच्या वेगवेगळ्या दरांच्या तफावतीमुळे वेगवेगळ्या राज्यांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात.  

Web Title: Reduce Price Of Petrol And Diesel By Rs. 1