वजन कमी करा ; व्यंकय्या नायडूंचा रेणुका चौधरींना टोला

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

''माझा सल्ला हाच आहे, की तुम्ही तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करा''. 

- एम. व्यंकय्या नायडू, सभापती, राज्यसभा

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांना टोला लगावला. ''तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वजन वाढवा'', असा उपरोधिक टोला लगावला. नायडूंच्या या टोल्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ माजला. 

Renuka Chowdhary

काँग्रेसच्या राज्यसभेतील काही सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या निरोप समारंभावेळी खासदार चौधरी सभागृहात मोठमोठ्याने हसल्या होत्या. त्यानंतर नायडूंनी चौधरी यांच्या जोरजोरात हसण्यावरून टीका केली होती. त्यानंतर आता नायडूंनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, रेणुका चौधरी यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ लवकरच संपत आहे.

''ते (नायडू) मला अनेक 'किलो'पासून ओळखत आहेत. महोदय, अनेक लोक माझ्या वजनाबाबत काळजीत आहेत. पण या कामात तुम्हाला तुमचे वजन सगळीकडे वापरता यायला हवे'', असे चौधरी म्हणाल्या. त्यावर नायडू म्हणाले, ''माझा सल्ला हाच आहे, की तुम्ही तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करा''. 

Web Title: Reduce your weight Venkaiah Naidu quip to Renuka Chowdhury in Rajya Sabha