घुसखोरीचे प्रमाण घटले : मनोहर पर्रीकर

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: सध्या सीमावर्ती भागामध्ये शांतता असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घुसखोरीच्या घटनांचे प्रमाणही कमी झाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.

सीमेवर सध्या शंभर टक्के शांतता असल्याचा दावा मी करत नाही; पण मागील वर्षीच्या तुलनेत या घटना निश्‍चितपणे कमी झाल्या आहेत, असे पर्रीकर यांनी "डेली मेल' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

मागील वर्षी झालेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याचे परिणाम दिसू लागले असून, सीमेवरील लष्कराची सुसज्जतादेखील वाढली आहे. ज्या काही कमतरता शिल्लक होत्या, त्या भरून काढण्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी लष्कराला दारूगोळ्याची चणचण भासत होती, ती गरजही आता पूर्ण करण्यात आली आहे. लष्कराकडून विविध प्रकारच्या 116 दारूगोळ्यांचा वापर केला जात होता, आता हे प्रमाणही कमी झाले आहे. लष्करी जवानांना उच्च दर्जाचे 1.89 लाख बुलेटप्रुफ जॅकेट दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. "मेक इन इंडिया' प्रकल्पाअंतर्गत 123 "तेजस' विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. वजनाला हलके लढाऊ हेलिकॉप्टर, रडार आदींच्या निर्मितीवरही भर देण्यात आला आहे.

Web Title: Reduced infiltration rate: Manohar Parrikar