पेट्रोल दोन रुपये 16 पैसे; डिझेल दोन रुपये 10 पैशांनी स्वस्त

पीटीआय
मंगळवार, 16 मे 2017

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांत घट करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशभरात पेट्रोल दोन रुपये 16 पैसे; तर डिझेल दोन रुपये 10 पैशांनी स्वस्त झाले. नवे दर सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

नवी दिल्ली - तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांत घट करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशभरात पेट्रोल दोन रुपये 16 पैसे; तर डिझेल दोन रुपये 10 पैशांनी स्वस्त झाले. नवे दर सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

स्थानिक करांनुसार प्रत्येक ठिकाणच्या दरांत बदल असेल, असे तेल कंपन्यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेलांच्या किमतीत घसरण होत असल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारल्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यात पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त
पुणे - पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या दरामध्ये कपात करण्यात आल्यामुळे शहरामध्ये पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त झाले. शहरामधील पेट्रोल आणि डिझेलचा अनुक्रमे दर 75 रुपये आणि 60 रुपये प्रतिलिटर असा राहील. मात्र शासनाने दिलेल्या "डायनॅमिक प्रायझिंग'च्या सवलतीमुळे शहराच्या विविध भागांतील पंपांवरील दरामध्ये 50 पैशांची तफावत राहील, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी दिली.

Web Title: Reduction in Petrol, diesel prices