काँग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते मासा आणि पाण्यासारखे : अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

''काँग्रेस सरकारला लिंगायत समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. मात्र, या समुदायाला याची जाणीव आहे''.

-  अमित शहा , राष्ट्रीय अध्यक्ष ,  भाजप

नवी दिल्ली : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून सातत्याने एकमेकांवर टीका केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''काँग्रेस सरकारला लिंगायत समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. मात्र, या समुदायाला याची जाणीव आहे''. तसेच ''काँग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते मासा आणि पाण्यासारखे आहे''.  

Siddaramaiah

सिद्धरामय्या म्हणाले, येडीयुरप्पाजींना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीतिमध्ये काँग्रेस बाधा आणत आहे. त्यांना (सिद्धरामय्या सरकार) लिंगायत समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. मात्र, सरकारच्या या रणनीतिबाबत लिंगायत समाजाला याची जाणीव आहे. निवडणुकीनंतरच भाजप आपली शक्ती दाखवेल. तसेच ते पुढे म्हणाले, ''कर्नाटकातील जनता अनेक मुद्यांवरून राज्य सरकारविरोधात निराश आहे. यातील मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार. काँग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते हे मासा आणि पाण्यासारखे आहे. त्यांचे हे नाते कधीही न तुटण्यासारखे आहे. कर्नाटक सरकार काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराचे एटीएम आहे. याशिवाय कर्नाटकचे काहीही महत्व नाही''. 

Web Title: The relation between Congress and corruption is like fish and water says BJP chief Amit Shah