अकबर यांच्याशी संबंध सहमतीने नव्हते ; पत्रकार गोगोई यांचा खुलासा

अकबर यांच्याशी संबंध सहमतीने नव्हते ; पत्रकार गोगोई यांचा खुलासा

नवी दिल्ली : माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या अमेरिकेतील महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी आज आणखी एक खळबळजनक खुलासा केला. अकबर यांच्यासोबतचे संबंध हे सहमतीने ठेवण्यात आले नव्हते. त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून माझे शोषणच केल्याचे गोगोई यांनी म्हटले आहे. 

गोगोई या सध्या अमेरिकेतील "नॅशनल पब्लिक रेडिओ' येथे मुख्य व्यापार संपादक म्हणून कार्यरत आहेत. जयपूर येथे वार्तांकनासाठी गेले असता, अकबर यांनी माझ्यावर हॉटेलातच बलात्कार केला होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. गोगोई यांच्या विधानानंतर आधीच कायदेशीर अडचणीत सापडलेल्या अकबर यांनी मात्र परस्पर सहमतीनेच हे संबंध ठेवण्यात आल्याचे म्हटले होते. खुद्द अकबर यांच्या पत्नी मल्लिका यांनीही या वादामध्ये उडी घेत पल्लवी यांच्यावर टीका केली होती. पल्लवी यांच्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला होता, असा दावाही त्यांनी केला होता. 

लेखावर ठाम 

गोगोई यांनी "वॉशिंग्टन पोस्ट'मध्येच अकबर यांच्या कृत्यावर टीका करणारा लेख लिहिला होता. यामध्येच त्यांनी अकबर यांच्याकडून झालेल्या लैंगिक छळाचाही भंडाफोड केला होता. या लेखातील प्रत्येक वाक्‍य आणि शब्दावर मी ठाम आहे. अन्य महिलांनीदेखील त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांवर बोलावे. त्यांना यासाठी धीर मिळावा, म्हणून मी सत्य बोलतच राहील, असे पल्लवी यांनी म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com