Agniveer Reservation : BSF मध्ये १० टक्के आरक्षण, वयोमर्यादेतही सूट; अग्निवीरांसाठी सरकारची मोठी घोषणा

Agniveer Bharati
Agniveer Bharatigoogle

नवी दिल्ली - Agniveer Reservation सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) रिक्त जागांसाठी केंद्र सरकारने अग्निविरांसाठी १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्याचबरोबर कमाल वयोमर्यादेचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, माजी अग्निवीर पहिल्या किंवा नंतरच्या बॅचचा भाग आहेत की नाही, यावर हे अवलंबून असेल.

Agniveer Bharati
Manish Sisodia : जेलमध्ये असतांनाच मनिष सिसोदियांना 'ईडी'कडून अटक; अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण

सीमा सुरक्षा दल कायदा १९६८ च्या कलम १४१ च्या उपकलम (२) मधील खंड (ब) आणि (क) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून गृह मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली.

आपल्या आधिकारांचा वापर करून केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी संवर्ग (अराजपत्रित) भरती नियम २०१५, म्हणजे सीमा सुरक्षा दल सामान्य कर्तव्य संवर्ग (अराजपत्रित) (दुरुस्ती) २०२३ भरती मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी नियमावली तयार करण्याची घोषणा केली आहे.

Agniveer Bharati
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर (अराजपत्रित) भरती नियम २०१५ येत्या ९ मार्चपासून लागू होत असून, कॉन्स्टेबल पदाशी संबंधित विभागासाठी कमाल वयोमर्यादेत सूट असलेल्या सूचना लावण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांना पाच वर्षांपर्यंत आणि माजी अग्निवीरांच्या इतर सर्व बॅचच्या उमेदवारांना तीन वर्षांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com