आरआयएल'च्या अध्यक्षपदी मुकेश अंबानींना मुदतवाढ

पीटीआय
रविवार, 8 जुलै 2018

- मुकेश अंबानी 1977 पासून कंपनीच्या संचालक मंडळावर 
- 2007 पासून कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी 
- वार्षिक वेतन 4.17 कोटी रुपये आणि 59 लाख रुपयांचे भत्ते 
- कंपनीच्या निव्वळ नफ्यावर बोनसही मिळणार 

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी मुकेश अंबानी यांची आणखी पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. 

अंबानी हे 61 वर्षांचे असून, ते 1977 पासून "आरआयएल'च्या संचालक मंडळावर आहेत. त्यांचे पिता धीरूभाई अंबानी यांचे जुलै 2002 मध्ये निधन झाल्यानंतर मुकेश यांची कंपनीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मुकेश यांची आणखी पाच वर्षांसाठी कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यास वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजुरी दिली आहे. 

सभेत मुकेश यांची आणखी पाच वर्षांसाठी निवड करण्याच्या ठरावाच्या बाजूने 98.5 टक्के, तर विरोधात 1.48 टक्के मतदान झाले. मुकेश यांचा सध्याचा कार्यकाळ 10 एप्रिल 2019 रोजी संपत असून, त्यानंतर हा पाच वर्षांचा कार्यकाळ सुरू होईल. 
 
- मुकेश अंबानी 1977 पासून कंपनीच्या संचालक मंडळावर 
- 2007 पासून कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी 
- वार्षिक वेतन 4.17 कोटी रुपये आणि 59 लाख रुपयांचे भत्ते 
- कंपनीच्या निव्वळ नफ्यावर बोनसही मिळणार 

Web Title: Reliance Industries seeks extending Mukesh Ambani's term