डिसेंबरपर्यंतच्या तिमाहीत रिलायन्सची बंपर कमाई; पाहा किती झाला नफा

कंपनाच्या कमाईत गेल्यावर्षीच्या याच तिमाहीपेक्षा त्यात ५२.२ टक्के वाढ झाली आहे.
Reliance
RelianceSakal

मुंबई : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजला वीस हजार कोटी रुपयांहूनही जास्त नफा झाल्याची माहिती अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. या काळात त्यांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला. (Reliance Industry Profit Within three month)

कंपनीला दोन लाख नऊ हजार ८२३ कोटी रुपये महसूल मिळाला असून गेल्यावर्षीच्या याच तिमाहीपेक्षा त्यात ५२.२ टक्के वाढ झाली आहे. यंदाचा करोत्तर नफा २० हजार ५३९ कोटी रुपये असून तो गेल्यावर्षीच्या याच तिमाहीपेक्षा ३७.९ टक्के जास्त आहे. प्रतिशेअर उत्पन्न २८.१ रुपये (गेल्या तिमाहीपेक्षा ३८.१ टक्के जास्त) आहे. डिजिटल सेवांमधून या तिमाहीत २५ हजार २०० कोटी रुपये (गेल्या वर्षीच्या तिमाहीपेक्षा ६.४ टक्के जास्त) महसूल मिळाला.

‘जिओ’चा महसूलही वाढला

जिओ व्यासपीठाचा या तिमाहीचा महसूल २४ हजार १७६ कोटी रुपये असून तो गेल्यावर्षीच्या याच तिमाहीपेक्षा १३.८ टक्के जास्त आहे. तर त्यांचा निव्वळ नफा तीन हजार ७९५ कोटी रुपये असून तो गेल्यावर्षीच्या याच तिमाहीपेक्षा ८.८ टक्के जास्त आहे. ३१ डिसेंबर रोजी ‘जिओ’ चे एकूण ग्राहक ४२ कोटी १० लाख असून त्यात यावर्षी एक कोटींची भर पडली आहे. जिओचा प्रत्येक फोनमागील दरमहा महसूल १५१.६ रुपये आहे. यातील वार्षिक वाढ ८.४ टक्के आहे.

सध्या दरवाढीला परवानगी मिळाली असली तरी त्याचे संपूर्ण वाढीव उत्पन्न २०२२ च्या एक ते दोन तिमाहीनंतरच जाणवेल, असेही मुकेश अंबानी म्हणाले. जिओकडे आता ५० लाख वायरबेस्ड ग्राहक आहेत, त्यात जिओ टीव्ही, लाइव्ह टीव्ही, गेमिंग आदींचा समावेश आहे. देशातील प्रमुख एक हजार लहानमोठ्या शहरांमध्ये फाइव्ह जी सेवा देण्याचे नियोजन पूर्ण झाले.

देशात ८३७ नवी दुकाने

रिलायन्स रिटेल महसूल ५२.५ टक्के वाढून ५७ हजार ७१४ कोटी रुपयांवर गेला. दुकानांमधून तसेच ऑनलाइन विक्री वाढल्याचे अंबानी यांनी सांगितले. या तिमाहीत रिटेल चा निव्वळ नफा दोन हजार २५९ हजार कोटी (२३.४ टक्के वाढ) रुपये झाला. स्टोअर तसेच ऑनलाइन मागणी वाढत असताना देशात ८३७ नवी दुकाने उघडण्यात आली. आता त्यांची एकूण संख्या १४ हजार ४१२ झाली.

रिलायन्स ऑइलचीही भरारी

रिलायन्स ऑइलचा महसूल एक लाख ३१ हजार ४२७ कोटी रुपये झाला. ‘रिलायन्स ऑइल अँड गॅस’ला दोन हजार ५५९ कोटी रुपये महसूल (४९३.७ टक्के वाढ) मिळाला. रिलायन्सने उत्तर अमेरिकेतील इगल फोर्ट शे ची मालमत्ता ४० कोटी डॉलरला विकली. प्रदूषित वायूंचे उत्सर्जन २०३५ पर्यंत शून्यावर यावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अंबानी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com