रिलायन्स जिओची नवीन ‘धन धना धन’ ऑफर

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

या नव्या ऑफरमध्ये जिओने जुनीच ऑफर देऊ केली आहे. म्हणजेच जिओकडून फक्त ऑफरचे नाव आता 'धन धना धन' करण्यात आले आहे

मुंबई: ट्रायच्या आदेशानुसार जिओकडून समर सरप्राइज ऑफर बंद करण्यात आल्यानंतर आता रिलायन्सने जिओने 'धन धना धन' ही नवी ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरमध्ये जिओने जुनीच ऑफर देऊ केली आहे. म्हणजेच जिओकडून फक्त ऑफरचे नाव आता 'धन धना धन' करण्यात आले आहे.

जिओच्या ग्राहकांना आता या नवीन ऑफरमध्ये 'समर सरप्राइज' ऑफरप्रमाणेच सर्व सुविधा मिळणार आहेत. या नव्या ऑफरअंतर्गत तीन महिन्यांसाठी अमर्यादित डेटा मिळणार असून फ्री एसएम एस सर्व्हिस, जिओ अॅप सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

'धन धना धन' ऑफरचा लाभ घेण्यासाठी जिओ प्राइमचे सबस्क्रिप्शन घेऊन रु309 आणि रु.509 भरणे गरजेचे आहे. दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिलेल्या आदेशानंतर नुकतीच रिलायन्सने जिओची समर सरप्राइज ऑफर मागे घेतली होती. सध्या ती पूर्णपणे बंद करून टाकण्यात आली असली तरी, ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी जिओकडून आकर्षक प्लॅन सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा दूरसंचार क्षेत्रात आधीपासूनच सुरू होती.

Web Title: Reliance Jio announces new Dhan Dhana Dhan offer