रिलायन्स जिओला एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला.
 

पणजी- माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला.

रिलायन्स जिओचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित जगातील पहिला ब्रँड एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म 'जिओइंटरॅक्ट'ला सर्वांत नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित सेवेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव अमेय अबियंकर, एजिस नॉलेजचे विश्वस्त भूपेश डाहेरीया आणि परीक्षक सुधीर गुप्ता व भरत छबरवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार  रिलायन्स जिओचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश दुर्वे यांनी स्वीकारला.

माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव्या संशोधक आणि उद्योजकांना एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन सेल ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय). टेलिकॉम सेंटर्स ऑफ एक्सलन्स (टीसीओई), कन्व्हर्जन्स इंडिया आणि केपीएमजी नॉलेज पार्टनर यांच्या वतीने करण्यात आले. 

'जिओइंटरॅक्ट' हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत ब्रँड एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म असून, व्हिडिओ कॉल सेंटर्स, व्हिडिओ कॅटलॉग आणि व्हर्च्युअल शोरुम्स अशी याची वैशिष्ट्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Jio wins Aegis Graham Bell Awards