हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या अन् दिल्लीच्या निर्भयाची आठवण!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

16 डिसेंबर 2012 या दिवशी निर्भयावर बलात्कार करून निर्घृणप्रकारे हत्या करण्यात आली होती. 2017 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला अन् निर्भयाला पाच वर्षांनी का होईना पण न्याय मिळाला... 

हैदराबाद : डॉ. प्रियांका रेड्डीच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कडक शिक्षा द्या अशी मागणी देशभरातून होत असतानाच आज सगळ्यांना आठवली ती दिल्लीतील निर्भया... 16 डिसेंबर 2012 या दिवशी तिच्यावर बलात्कार करून निर्घृणप्रकारे हत्या करण्यात आली होती. 2017 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला अन् निर्भयाला पाच वर्षांनी का होईना पण न्याय मिळाला... 

प्रियांका म्हणाली, भिती वाटतेय अन् फोन ऑफ झाला...

पुन्हा 'निर्भया'; हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार करून तरुणीला जाळले

राजधानी दिल्लीत पाच वर्षांपूर्वी डिसेंबरच्या कडाक्‍याच्या थंडीत एका चालत्या बसमध्ये सहा तरुणांनी एका तरुणीवर अत्याचार केला आणि सारा देश हादरून गेला. राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेची लक्‍तरे त्यामुळे चव्हाट्यावर आली. फिजिओथेरपीची इंटर्न असलेली ‘निर्भया’ रात्री घरी परतत असताना, एका बसचालकाने तिला घरी इच्छितस्थळी पोचवण्याची ग्वाही देऊन बसमध्ये घेतले आणि तोच तिच्या आयुष्यातील दुर्दैवी क्षण ठरला. चालत्या बसमध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देशाला मोठा धक्‍का बसला आणि प्रसारमाध्यमांनी हा प्रश्‍न लावून धरला. या प्रकरणी चार आरोपींना शिक्षा देखील झाली. 

Image result for nirbhaya delhi candle march

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिकाच फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. या याचिकेवर पुनर्विचार करण्यासाठी कोणतीच पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यावर पुनर्विचार करता येणार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. दोषींची फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. परंतु, सरकारी वकिलांनी या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचे अपील केले होते, ते सर्वोच्च न्यायलयाने मान्य करत या दोषींची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली व त्यांना फाशीची शिक्षा झाली.

Image result for nirbhaya delhi case
निर्भयाचे मारेकरी

प्रियांका आणि निर्भया या दोघींची हत्या तितक्याच निर्घृणपणे करण्यात आली आहे. मदतीच्या बहाण्याने प्रियांकावर बलात्कार केला गेला व त्यानंतर ती ओळखूही येणार नाही असे तिला जाळण्यात आले. घरच्यांच्या डोळ्यासमोर सुंदर आणि कतृत्त्वान मुलीचा जीव गेला, तो फक्त पाशवी प्रवृत्तीमुळे. तिच्या हत्येमुळे आज देशला आज निर्भया प्रकणाची आठवण हेत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remembrance of Nirbhaya case on Dr Priyanka Reddy murder case