'होर्डिंग्जवरून राजकीय नेत्यांचे छायाचित्रे काढा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नवी दिल्ली- देशातील पाच राज्यांमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका होत असून, होर्डिंग्जवरील राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकावीत, असे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. चार जानेवारी पासून पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. पाचही राज्यांमध्ये असलेल्या होर्डिंग्ज व जाहिरातींवरील राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकावीत. शिवाय, जाहिरात करणारी फलके झाकून टाकावीत, असे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.

गोवा, पंजाबमध्ये 4 फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्यात मतदान होत असून 4 मार्चला पहिला टप्पा (38 जागा) तर 8 मार्चला दुसरा टप्पा असणार आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पाच राज्यात 690 विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असून, सुमारे 16 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार असून, सर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार आहेत. शिवाय, त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी माहिती पुस्तक देण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाचे नसीम झैदी यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार-

 • पहिला टप्प्याचं मतदान 11 फेब्रुवारीला
 • दुसरा टप्प्याचं मतदान 15 फेब्रुवारीला
 • तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 फेब्रुवारीला मतदान
 • चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारीला मतदान
 • पाचव्या टप्प्याचं मतदान 27 फेब्रुवारीला
 • सहाव्या टप्प्याचं मतदान 4 मार्चला
 • सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 08 मार्चला मतदान

निवडणूकांच्या तारखा-

 • गोवा, पंजाब - 4 फेब्रुवारी
 • उत्तराखंड - 15 फेब्रुवारी
 • मणिपूर - 4 व 8 मार्च मतदान (दोन टप्प्यात)
 • उत्तर प्रदेश- सात टप्प्यांमध्ये मतदान
Web Title: Remove photos of political leaders from all hoardings before polls: Election Commission