भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी दुरुस्ती आणि तयारी आवश्‍यक

कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाणही आता ८० टक्क्यांनी कमी झाले असून लसीकरणाचा वेगही वाढला असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
Narendra Modi
Narendra ModiSakal

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या(Coronavirus) दुसऱ्या लाटेतून (Second Wave) भारत (India) सावरत असताना, आरोग्य (Health) आणि वित्त क्षेत्राची दुरुस्ती करून भविष्यातील (Future) आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना तयार करण्याकडे आता लक्ष देणे आवश्‍यक (Important) आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज केले. ‘व्हिवा टेक’ परिषदेत मोदींनी आज भाषण केले. (Repairs and Preparation are Needed to Meet Future Challenges Narendra Modi)

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘विकासाचा दर कायम चांगला ठेवण्यासाठी मूलभूत तयारी म्हणून सरकार सातत्याने सुधारणा करत असून संसर्गाच्या परिस्थितीचा फटका बसलेल्या गरीबांना मदत करणारी अन्न वितरण योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात अनेक क्षेत्रांना अडचणी आल्याचे आपण पाहिले. अनेक अडचणी अजूनही कायम आहेत. पण यामुळे निराश होण्याचे कारण नाही. आपण दुरुस्ती आणि तयारी या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी या वेळी लस तयार करण्यासाठी जग धडपडत होते. आज भारतात दोन लशींची निर्मिती होत असून आणखीही काही लशी विकासाच्या मार्गावर आहेत. आपण आपल्या आरोग्य आणि वित्त क्षेत्राची सातत्याने दुरुस्ती करायला हवी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या साथीच्या रोगापासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी आतापासून तयारी करायला हवी.’’

कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाणही आता ८० टक्क्यांनी कमी झाले असून लसीकरणाचा वेगही वाढला असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Narendra Modi
सामान्यांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित, आता 4G वर धावणार ट्रेन

मोदी उवाच...

  • पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब आवश्‍यक

  • संशोधन सहकार्य वाढवावे

  • सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आण्यासाठी प्रयत्नशील

  • स्टार्ट अप कंपन्यांनी आरोग्य, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन करावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com