2014 च्या निकालाची पुनरावृत्ती करा - शहा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

आगामी लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. एसजी मार्गवरील एसजीव्हीपी गुरुकुल येथे आयोजित भाजपच्या चिंतन शिबिरात अमित शहा यांनी 2014 प्रमाणेच 2019 च्या निवडणुकीत गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागा जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
 

अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. एसजी मार्गवरील एसजीव्हीपी गुरुकुल येथे आयोजित भाजपच्या चिंतन शिबिरात अमित शहा यांनी 2014 प्रमाणेच 2019 च्या निवडणुकीत गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागा जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

चिंतन शिबिरात मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्यासह भाजपचे नेते सहभागी झाले होते. राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याबद्दल शहा यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुर्लक्षित भागावर आणखी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती प्रत्येक मतदारांपर्यंत पोचवा. गुजरातमधील प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या पुढाकाराची माहिती नागरिकांना द्या, असे आवाहन शहा यांनी म्हणाले. 2014 च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी पक्षाने नियोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीतील वाढत्या वादाचा लाभ कसा घेता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Repeat the results of 2014 says amit Shah