काँग्रेसच्या मुख्यालयासमोर चक्क 'राफेल'!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मे 2019

दिल्लीतील 24 अकबर रोडवर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. राफेलची येथील प्रतिकृती दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लढावू विमान खरेदीचा मुद्दा लावून धरला होता. राहुल गांधी यांनी प्रत्येक सभेत राफेलच्या मुद्यावरून मोदी सरकारवर टीका केली होती. राफेलचा मुद्दा चर्चेत आला होता. दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयासमोर असलेल्या राफेल विमानाची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दिल्लीतील 24 अकबर रोडवर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. काँग्रेस मुख्यालयाला लागूनच वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. शेजारी काँग्रेस मुख्यलय असल्यामुळे ही प्रतिकृती काँग्रेस मुख्यालयासमोर लावण्यात आल्याचा भास होतो. राफेलची येथील प्रतिकृती दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.

धनोआ यांनी काही दिवसांपूर्वीच राफेल विमानांचे कौतुक करताना उत्सकता लागल्याचे म्हटले होते. राफेल विमानाची प्रतिकृतीच धनोआ यांच्या घरासमोर लावण्यात आली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये राफेल विमान भारतात दाखल होणार आहे. मात्र, राफेलची प्रतिकृती काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर भासत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Replica of Rafale jet erected outside Air Chief Marshal BS Dhanoas residence in Delhi