लैंगिक अत्याचाराबद्दल तक्रार नोंदवा : मेनका गांधी 

पीटीआय
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : बाल लैंगिक अत्याचाराबाबत गुन्हा नोंदविण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा न ठेवण्याच्या सूचना कायदा मंत्रालयाला दिल्या असल्याचे केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी आज सांगितले. यामुळे दहा-पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचारांबाबतही तक्रार नोंदविणे नागरिकांना शक्‍य होऊ शकेल. 

मेनका गांधी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "भारतातही ---मीटू----- चळवळ सुरू झाल्याने मला आनंद झाला आहे. लैंगिक अत्याचार अथवा विनयभंग झाला असल्यास महिलांनी त्याविरोधात तक्रार करण्यास पुढे यावे.'' सध्याच्या कायद्यानुसार, बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडल्यास तीन वर्षांच्या आत तक्रार नोंदविणे आवश्‍यक आहे. तसेच, तक्रार नोंदविण्यास विलंब झाल्यास आणि त्या विलंबाचे कारण न्यायालयाला पटवून दिल्यासही गुन्हेगाराला शासन होऊ शकते. मात्र, अनेकदा लहानपणी झालेल्या अत्याचारांबद्दल जाहीरपणे सांगण्यास संबंधित व्यक्तीला वयाच्या अठरा वर्षांनंतरही अडचणी येतात. 

मेनका गांधी यांनी मात्र आज या अत्याचारांबाबत तक्रार नोंदविण्यास पुढे येण्यास प्रोत्साहन दिले. "महिला या विविध ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत संतप्त आहेत, त्यामुळेच त्यांनी तक्रार नोंदवावी. मात्र, याचा गैरवापर करून कोणाही व्यक्तीला लक्ष्य करू नये,' असे मेनका गांधी म्हणाल्या. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आक्षेपार्ह वर्तणुकीचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिलाही मेनका गांधी यांनी पाठिंबा दिला. कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठणकावले. 

Web Title: Report sexual harassment Maneka Gandhi