प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास 'डुडल'

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

गुगलसह ट्विटर आणि फेसबूकवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसत आहे. ट्विटरवर #प्रजासत्ताकदिवस #RepublicDay  #गणतंत्रदिवस #HappyRepublicDay या हॅशटॅगसमोर तिरंगा झळकतो.

नवी दिल्ली - भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलकडून विशेष डुडल तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशभरात आज (गुरुवार) प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असून, जगभरात सर्च इंजिन वापरण्यात येणाऱ्या गुगलनेही भारतीय तिरंग्याला डुडलद्वारे मानवंदना दिली आहे. तिरंग्यातील रंगाच्या आकाराचे स्टेडियन बनवून गुगलने हे विशेष डुडल बनविले आहे. या डुडलमध्ये राजपथावर होणाऱ्या पथसंचलनाप्रमाणे स्टेडियमवरील पथसंचलन दाखविण्यात आले आहे. गेल्यावर्षीही गुगलने डुडल बनविले होते.

गुगलसह ट्विटर आणि फेसबूकवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसत आहे. ट्विटरवर #प्रजासत्ताकदिवस #RepublicDay  #गणतंत्रदिवस #HappyRepublicDay या हॅशटॅगसमोर तिरंगा झळकतो. तर फेसबुकनेही आपल्या युझर्सना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारा मेसेज दिला आहे.

Web Title: Republic Day: Google shows special stadium doodle