Republic Day 2020 : भारताच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय?  पहिला प्रजासत्ताक दिना कुठे झाला? असे प्रश्न विचारले, तर याचे उत्तर अनेकांना माहिती नसते. पण आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत. आपल्याला तर माहीतच आहे..की  भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० ला आपला देश संविधान स्विकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक सार्वभौमिक, आणि गणराज्य बनला

नाशिक : स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय?  पहिला प्रजासत्ताक दिना कुठे झाला? असे प्रश्न विचारले, तर याचे उत्तर अनेकांना माहिती नसते. पण आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत. आपल्याला तर माहीतच आहे..की  भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० ला आपला देश संविधान स्विकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक सार्वभौमिक, आणि गणराज्य बनला. 

Image may contain: 9 people, people standing, wedding and indoor

भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू

ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. तेव्हा तर  देशभरात हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करतो. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस २६ जानेवारी हा दिवस आपण ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता.

Image may contain: one or more people, crowd, sky and outdoor

संविधान तयार करण्याकरीता तब्बल 'इतक्या' दिवसाचा कालावधी

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९३० साली २६ जानेवारीला लाहोर येथे जे अधिवेशन झाले. त्यात आपला तिरंगा ध्वज फडकवुन संपुर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याचे स्मरण म्हणुन हा दिवस राज्यघटना अमलांत आणण्याकरता निश्चित करण्यात आला.संविधान समितीने भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्विकृत केले आणि पुढे १९५० साली २६ जानेवारी या दिवशी पासुन भारतीय संविधानाला अमलांत आणण्यात आले. भारताच्या संविधानाला संविधान समितीव्दारे तयार करण्यात आले होते. हे संविधान तयार करण्याकरीता तब्बल २ वर्ष, ११ महीने और १८ दिवसाचा कालावधी लागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्याकरीता २९ ऑगस्ट १९४७ या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती.

कसा साजरा करतात २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन? 
२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे राजपथावरून एका मोठया परेडचे आयोजन करण्यात येते. रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन या राजपथावरून या पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. हे पथसंचलन 'याची देही याची डोळा' या ओळींप्रमाणे डोळयांचे अक्षरशः पारणे फेडते. या पथसंचलनापुर्वी भारताचे प्रधानमंत्री 'अमर जवान ज्योती' या सैनिकांकरता बनविल्या गेलेल्या स्मारकाजवळ जावुन तेथे वंदन करतात. भारत देशाकरीता ज्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अश्या सैनिकांचे यावेळी स्मरण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते. त्यानंतर प्रधानमंत्री आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भेटी घेतात. राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुण्यांसोबत आगमन होते. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि राष्ट्रगीत सुरू होते. या प्रसंगी २१ तोफांची सलामी देण्यात येते. वीर सैनिकांना अशोक चक्र आणि किर्ती चक्र हे पुरस्कार दिले जातात. अतुलनिय शौर्य गाजवलेल्या बालविरांची या संचलनात मिरवणुक काढली जाते. 

Image may contain: 5 people, people smiling, outdoor
भारतातील पहिला प्रजासत्ताक दिन कुठे झाला?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमानिमित्त राजपथावर भारताची सांस्कृतिक परंपरा, विविध क्षेत्रातील योगदान, तसेच देशाच्या सामर्थ्याचं दर्शन संपूर्ण जगाला घडवलं जातं २६ जानेवारी १९५० रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण हा प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे, तर इर्विन स्टेडियम ( सध्याचं नॅशनल स्टेडियम)वर झाला. विशेष म्हणजे, १९५० ते १९५४ पर्यंत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला, रामलीला मैदान आदी ठिकाणी झाला. पण १९५५ पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजपथावर मोठ्या उत्साहात होतो. या कार्यक्रमानिमित्त आयोजित करणाऱ्या संचलनाची सुरुवात, रायसीना हिल्सवरुन होते. इथून राजपथ, इंडिया गेट मार्गे लाल किल्ल्यावर येऊन ती संपते. सन २०१६ मध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय जवानांसह फ्रान्सच्या सैनिकांनीही सहभाग घेतला. तब्बल ६७ वर्षांनी ही ऐतिहासिक घटना घडली. या कार्यक्रमासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसवा ओलांदा हे प्रमुख पाहुणे होते.\

Image may contain: 1 person, crowd and outdoor

"विविधतेतुन एकता"
२६ जानेवारीचे औचित्य साधत परराष्ट्रातील राष्ट्राध्यक्षांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्या जाते. आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंन्द्र प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १९५० ला दिल्लीतील राजपथावर पथसंचलन आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या भारत देशाचे जे महत्वाचे वैशिष्टय आहे ते म्हणजे विविधतेतुन एकता त्या गोष्टीला या पथसंचलनातुन मानवंदना देण्यात आली होती. आज आपल्या भारत देशाची गणना शक्तिशाली देशांमध्ये करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या या औचित्याने आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायला हव्या व आपल्या राष्ट्राच्या विकासाकरता आणि समृध्दीकरता परमेश्वराजवळ प्रार्थना करायला हवी की आम्ही आमच्या देशाला विश्वातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्यात यशस्वी होऊ दे हीच प्रार्थना करूया!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic day information about importance and how to celebrate Marathi News