esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा लुक चर्चेत; गुजरातची शाही पगडी आकर्षण
sakal

बोलून बातमी शोधा

republic day pm modi look

 दिल्लीत राजपथावर आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेगळा लूक बघायला मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा लुक चर्चेत; गुजरातची शाही पगडी आकर्षण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - दिल्लीत राजपथावर आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेगळा लूक बघायला मिळाला. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी खास पगडी घातली होती. लाल रंगाच्या या हलारी पगडीवर पिवळ्या रंगाच्या टिकल्या होत्या. ही पगडी गुजरातमधील जामनगरच्या शाही कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली होती. 

जामनगरच्या खासदार पूनमबेन मादाम यांनी ट्विट करून म्हटलं की, पारंपरिक हलारी पगडी आमच्या भागातील समृद्ध वारशाचं प्रतिनिधित्व करते. जामनगर त्याच्या समृद्ध वारशासाठी ओळखलं जातं. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जामनगरची हलारी पगडी घातली ही आमच्यासाटी अभिमानाची गोष्ट आहे. 

हे वाचा - Tractor Parade - पुष्पवृष्टीने स्वागत ते लाल किल्ल्यावर धडक; पाहा शेतकरी आंदोलनाचे फोटो

पंतप्रधान मोदी पगडीसह पारंपरिक कुर्ता, पायजमा आणि ग्रे रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले. तसंच त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी मास्कही लावला होता. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची पगडी चर्चेत होती. 

गेल्या वर्षी मोदींनी भगव्या रंगाचा फेटा घातला होता. तर पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या स्वातंत्र्य दिनी 2014 मध्ये त्यांनी लाल रंगाचा जोधपुरी फेटा डोक्याला गुंडाळला होता. त्याचा मागचा भाग हिरव्या रंगाचा होता. 

हे वाचा - लाल किल्ल्यावर फडकवलेला झेंडा खलिस्तानी? जाणून घ्या सत्य

2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. वेगवेगळे रंग त्यामध्ये होते. 2016 मध्ये त्यांनी गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता. तर 2017 मध्ये गडद लाल आणि पिवळ्या रंगाची पगडी घातली होती. दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये मोदींनी भगव्या रंगाचा फेटा घालून लाल किल्ल्यावर भाषण दिलं होतं. 

loading image