देशात तब्बल 1500 आयएएस अधिकाऱ्यांचा तुटवडा

टीम ई-सकाळ
बुधवार, 10 जुलै 2019

- 1500 आयएएस अधिकाऱ्यांचा आहे तुटवडा.

नवी दिल्ली : देशात जवळपास 1500 आयएएस अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याची माहिती मनुष्यबळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत दिली. 1 जानेवारी 2019 ला कार्यरत असणाऱ्या देशातील एकूण आयएएस अधिकाऱ्यांची संख्या 5,205 इतकी होती. प्रत्यक्षात अधिकृतपणे 6,699 आयएएस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे.

अधिकाऱ्यांचा तुटवडा पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय सेवेच्या परीक्षेद्वारे (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन) भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. 1998 मध्ये 55 असणारी संख्या वाढवून 2013 मध्ये 180 वर नेण्यात आली आहे. आयएएस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ पूर्ण करण्यासाठी नियुक्ती समितीच्या बैठका घेण्यात आल्याचीही माहिती सिंग यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Requirement of 1500 IAS officers in the country