ग्रीसच्या तुरुंगातून बेळगाव जिल्ह्यातील अभियंत्याची सुटका 

ग्रीसच्या तुरुंगातून बेळगाव जिल्ह्यातील अभियंत्याची सुटका 

निपाणी - ग्रीसमधील ऍड्रॉमेडा शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या पाच अभियंत्याना ग्रीस येथील नेव्ही प्रशासनाने जहाजांमध्ये स्फोटके असल्याच्या संशयावरून तुरुंगात डांबले होते. यामध्ये बुदिहाळ (जि. बेळगाव) येथील सतीश विश्वनाथ पाटील यांचा समावेश होता. त्यांना सोडविण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. अखेर चौदा महिन्यानंतर या सर्वांची मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे अभियंते पाटील यांच्यासह इतर अभियंत्याच्या कुटुंबांमधून समाधान व्यक्त होत आहे. सर्वजण मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी परतले आहेत. सतीश पाटील हे काही दिवसातच आपल्या मूळगावी बुदिहाळ येथे भेट देणार आहेत. 

बुदिहाळ येथील अभियंते सतीश पाटील यांच्यासह जयदीप ठाकूर, भूपेंद्र सिंह, गगनदीप कुमार, रोहितेश कुमार हे मालवाहू जहाज घेऊन तुर्की देशातून इजिप्तकडे निघाले होते. त्यावेळी जहाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी जवळच्या ग्रीस बंदरावर नेण्यात आले. दुरुस्तीनंतर जहाज पुन्हा इजिप्तकडे जात असतानाच तुर्कीच्या नेव्हीने सदर जहाजावर हद्द तोडल्याचा आरोप करत जहाजासह पाच अभियंत्यांना ताब्यात घेतले होते.

जहाजांमध्ये संशयास्पद स्फोटके असल्याचा ठपका ठेवून तुर्कीच्या नौदलाने पाचही अभियंत्यांना ताब्यात घेतले. दरम्यान सर्व अभियंत्यावर कारवाई करून ग्रीसमधील तुरुंगात डांबले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. तब्बल 14 महिन्यानंतर जहाजामध्ये असणारे स्फोटक पदार्थ नसून फटाके बनवण्याची कच्ची सामग्री असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर अभियंत्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हे अभियंते विमानाने रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत.

सर्व अभियंत्यावर वैद्यकीय व मानसिक उपचार झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. अभियंता सतीश पाटील यांची निर्दोष मुक्तता करून सुटका झाल्याने कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. 

आपल्या मुलाची कोणतीही चूक नसताना विनाकारण 14 महिने ग्रीसने तुरुंगात डांबले होते. आता सतीश पाटीलसह सर्व अभियंते सुखरूप परतले आहेत. त्यामुळे आपल्यासह कुटुंबातील नातेवाईकांना मोठा आनंद झाला आहे. 
- विश्वनाथ पाटील,
बुदिहाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com