अंदमानमध्ये 300 जणांची सुटका; हवामानात सुधारणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पोर्ट ब्लेअर- वादळी हवामानामुळे अंदमानच्या दोन बेटांवर अडकलेल्या एकूण 1400 पर्यटकांपैकी सुमारे 300 जणांची शुक्रवारपर्यंत सुटका करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन, नौदल आणि तटरक्षक दल संयुक्तपणे हे बचावकार्य करीत आहेत.

शुक्रवारी वातावरणात थोडीशी सुधारणा झाल्यावर भारतीय हवाई दलाच्या तीन हेलिकॉप्टर्सच्या चार हवाई फेऱ्यांच्या माध्यमातून 85 पर्यटकांना बाहेर काढण्यात आले, असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
याव्यतिरिक्त पोर्ट ब्लेअर येथे बचावकार्यासाठी गेलेल्या तटरक्षक दलाच्या दोन नाविक जहाजांतून सकाळच्या प्रहरामध्ये आणखी 200 पर्यटकांची सुटका करण्यात आली. 

येथे अडकलेल्या इतर पर्यटकांची सुटका करण्यासाठी 'कनकलता बरुआ' आणि 'राजवीर' या ही तटरक्षक दलाची जहाजे आता हॅवलॉक बेटावर लावण्यात आली आहेत. 
वादळी हवामानामुळे नील आणि हॅवलॉक या बेटांवर सुमारे 1400 पर्यटक अडकल्यानंतर चार दिवसांनी हवामान हळूहळू सुधारू लागले. सूर्यदर्शन होऊ लागताच ही मोहीम जोमात सुरू करण्यात आली. पोर्ट ब्लेअरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेली हॅवलॉक आणि नील ही बेटे पर्यटकांची प्रमुख आकर्षण आहेत. हवामानाचा सर्वाधिक फटका याच बेटांना बसला आहे.
 
Web Title: Rescue operations continue in Andamans, 300 tourists evacuated