आरक्षण कोणालाही रद्द करू देणार नाही : अमित शहा

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

''आरक्षण धोरण बदलण्याची कोणीच हिंमत करू शकत नाही. संविधानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलेले आहे. भारताच्या संविधानावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण बदलण्याची हिंमत कोणीच करणार नाही. आरक्षण धोरणात बदल करण्यास भाजप कधीही मंजुरी देणार नाही''.

- अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष

भुवनेश्वर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांना नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्यात येणारे आरक्षण केंद्र सरकार रद्द करणार नाही आणि ते कोणाला रद्दही करू देणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (बुधवार) दिले. 

कालाहांडी जिल्ह्यातील भवानीपटणा परिसरात एका जाहीर सभेत अमित शहा बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी 'भारत बंद' पुकारला होता. या बंददरम्यान प्रचंड हिंसाचार माजला होता. यामध्ये देशभरातील 10 आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. 

त्यावर अमित शहा म्हणाले, ''आरक्षण धोरण बदलण्याची कोणीच हिंमत करू शकत नाही. संविधानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलेले आहे. भारताच्या संविधानावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण बदलण्याची हिंमत कोणीच करणार नाही. आरक्षण धोरणात बदल करण्यास भाजप कधीही मंजुरी देणार नाही''.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation will not be cancelled says BJP president Amit Shah