कानाखाली मारून आरक्षणाचा हक्क परत मिळवा- कल्याण सिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

'कोणी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानाखाली मारून आरक्षण परत मिळवा आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क असून हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही' असे राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मागासवर्गीयांना म्हटले आहे. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

लखनऊ- 'कोणी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानाखाली मारून आरक्षण परत मिळवा आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क असून हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही' असे राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मागासवर्गीयांना म्हटले आहे. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

काहीही झाले तरी आरक्षणाचा हक्क गमावू नका, असेही कल्याण सिंह यांनी यावेळी सांगितले. आपण घटनात्मक पदावर असल्याने राजकारणाबाबत वक्तव्य करू शकत नाही. मात्र सामाजिक विचार जरूर व्यक्त करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

'आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष माजी दिवंगत पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी खूप संघर्ष केलेला आहे. त्यांनी मंडल आयोग लागू केला. त्यावेळी देशात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलने झाली, रक्तसुद्धा वाहिले, परंतु त्यांनी कशाचीही पर्वा न करता मंडल आयोग लागू केला. त्यांच्यामुळेच आज तुम्हाला आरक्षण आहे, असे त्यांनी व्ही. पी. सिंग यांच्याविषयी सांगितले.

कुठल्याही वर्गाला आरक्षण मिळाले तरी आपल्याला त्याची चिंता नसावी, परंतु आपला आरक्षणाचा हक्क कोणी हिरावून घेत असेल, तर आपण शांत बसता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: reservation is your right slap if any body snatch it says kalyan singh