भागधारकांसोबतची बैठक रद्द ; रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय

भागधारकांसोबतची बैठक रद्द ; रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय

मुबंई : कर्ज संकटात अडकलेल्या "इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग ऍण्ड फायनान्स सर्व्हिसेस' समूहाच्या भागधारकांसाबेतची नियोजित बैठक रिझर्व्ह बॅंकेने रद्द केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "आयएल ऍण्ड एफएस'च्या प्रमुख भागधारकांसोबत रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी (ता. 28) बैठक आयोजित केली होती. यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियासह अन्य भागधारकांचा समावेश होता. समूहातील उपकंपन्यांनी विविध कर्जांचे हप्ते थकविले आहेत. या कर्ज संकटातून बाहेर पडण्यासाठी समूह नेमकी काय पावले उचलणार आहे आणि समूहाचा भविष्यातील कृती आराखडा याचे तपशील रिझर्व्ह बॅंकेला आधी हवे आहेत. यामुळे रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारची बैठक रद्द केली. 

बैठकीची पुढील तारीख अद्याप ठरविण्यात आलेली नाही. "आयएल ऍण्ड एफएस'ची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 सप्टेंबरला होत आहे. कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा असून, 27 ऑगस्टपासून समूहाने कर्जाचे अनेक हप्ते थकविले आहेत. समूहाला तातडीने तीन हजार कोटी रुपयांच्या भांडवली मदतीची गरज असून, समूह समभाग विक्रीतून साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखत आहे. 

समूहावरील एकूण कर्ज : 91,000 कोटी रुपये 
भांडवलाची गरज : 3,0000 कोटी रुपये 


समूहातील प्रमुख भागधारक 
(आकडेवारी टक्‍क्‍यांमध्ये) 
एलआयसी : 25.34 
ओरिक्‍स कॉर्पोरेशन : 23.54 
अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी : 12.56 
एचडीएफसी : 9.02 
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया : 7.67 
स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 6.42 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com