रिझर्व्ह बॅंकेकडून दरकपातीची शक्‍यता

पीटीआय
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नोटाबंदीनंतर पहिला पतधोरण आढावा; पाव टक्का कपातीचा अंदाज
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडून बुधावारी (ता. 7) जाहीर होणाऱ्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदरात 0.25 टक्के कपात होण्याची शक्‍यता आहे. नोटाबंदीचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून हे पाऊल उचलले जाईल, असा अंदाज बॅंकांकडून व्यक्त होत आहे.

नोटाबंदीनंतर पहिला पतधोरण आढावा; पाव टक्का कपातीचा अंदाज
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडून बुधावारी (ता. 7) जाहीर होणाऱ्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदरात 0.25 टक्के कपात होण्याची शक्‍यता आहे. नोटाबंदीचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून हे पाऊल उचलले जाईल, असा अंदाज बॅंकांकडून व्यक्त होत आहे.

पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेचा हा पहिला पतधोरण आढावा आहे. नोटाबंदीनंतर बॅंकांतील जमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पहिल्या पतधोरण आढाव्यात रेपोदरात 0.25 टक्के कपात करून तो 6.25 टक्‍क्‍यांवर आणला होता. पतधोरण समितीच्या शिफारशीवर आधारित हे दुसरे पतधोरण असेल. जानेवारी 2015 पासून रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात 1.75 टक्के कपात केली आहे.

बाजार स्थिरीकरण योजनेची (एमएसएस) मर्यादा 6 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रोख राखीव गुणोत्तरात (सीआरआर) तात्पुरती झालेली वाढ कायम राहणार नाही, असे बॅंकांना वाटते. बॅंकांमध्ये जमा वाढल्याने रिझर्व्ह बॅंकेने 28 नोव्हेंबर सीआरआर तात्पुरत्या स्वरूपात शंभर टक्‍क्‍यांवर नेला होता. बॅंकांतील वाढती जमा आणि व्याजदर यांचा मेळ साधण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून दरकपात होण्याची शक्‍यता अधिक आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये चलनावढ 4 टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ 3.39 टक्के, तर किरकोळ चलनवाढ 4.20 टक्के होती.

चलनवाढ कमी होत असून, आगामी पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात 0.25 टक्के कपात होणे अपेक्षित आहे.
- राकेश शर्मा, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅनरा बॅंक

रिझर्व्ह बॅंकेकडून रेपोदर 6 टक्‍क्‍यांवर येण्याची शक्‍यता आहे. नोटाबंदीच्या परिणामुळे पुढील दोन तिमाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.
- आर. के. बन्सल, मुख्य वित्तीय अधिकारी, आयडीबीआय बॅंक

Web Title: The Reserve Bank may rate decrease