मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

व्हायरल झालेल्या राजीनाम्याच्या पत्राचा मुद्दा सभागृहात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीच मांडला. राज्यात कोणत्या पातळीवर कार्य चालले आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला हाणला.

बंगळूर : कर्नाटकात सत्तेचे नाट्य सुरु असताना सोमवारी रात्री सभागृहात चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याचे बनावट पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यावर बनावट सही होती.

व्हायरल झालेल्या राजीनाम्याच्या पत्राचा मुद्दा सभागृहात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीच मांडला. राज्यात कोणत्या पातळीवर कार्य चालले आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला हाणला.

युती सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाचे नाट्य सोमवारी रात्री प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवत राहिले. अखेर रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी अध्यक्षांनी कामकाज मंगळवारी (ता.23) सकाळी दहापर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आज कर्नाटकमधील सत्ता नाट्यावर पडदा पडणार आहे.

मंगळवारी कामकाज घेण्याची मागणी करत केलेला गदारोळ सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडला. तर भाजपने आजच कितीही वेळ लागला तरी कामकाज चालवण्याची केलेली विनंती अध्यक्षांनी नजरेआड केली. त्याचवेळी अध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत आज चारपर्यंत चर्चा तर सहापर्यंत मतदान घेण्याचा निर्णय घेतला. तसेच आज सहा वाजल्यानंतर एकही मिनिट थांबणार नसल्याचा कडक इशारा दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resignation fake someone forged my signature alleges CM Kumaraswamy