राजीनामा दिला, आता मी मुक्त: शिवराजसिंह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी मी आता मुक्त आहे, असे म्हटले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी मी आता मुक्त आहे, असे म्हटले आहे.

मध्य प्रदेशात आज (बुधवार) मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा जिंकता आल्या. अपक्षांना सात जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये बसपच्या 2 आणि समाजवादी पक्षाची एक जागा आहे. तर चार अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला बहुमतासाठी फक्त दोन जागांची आवश्यकता होती आणि बसपने समर्थन दिल्याने काँग्रेसचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीनंतर शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा दिला.

यावेळी शिवराजसिंह म्हणाले, की मी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. या पराभवाची पूर्णपणे जबाबदारी मी स्वीकारतो. या विजयाबद्दल मी कमलनाथ यांचे आभिनंदन करतो. आम्हाला मते जास्त मिळाली, पण संख्याबळात आम्ही कमी पडलो. आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

Web Title: resigned by Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan