आता एवढंच राहिलं होतं ... आलू पराठा, गोबी पराठा या सोबतच आलाय 'मास्कवाला पराठा'

प्राजक्ता निपसे
Tuesday, 14 July 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णसंख्येदरम्यान एक अनोखा प्रयोग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मदुराईच्या एका रेस्टॉरंटमध्ये वेगळा  प्रयोग केला गेला आहे . कोणता आहे तो  प्रयोग  जाणून घ्या या प्रयोगाबाबत...

मदुराई : कोरोना व्हायरसच्या विरोधात लढ्ण्यासाठी लोकांमध्ये जण जागरुकता पसरविण्याच्या उद्देशानं मदुराईमधील एका रेस्टॉरंटमध्ये पराठ्यांबाबत एक अजबच प्रयोग केला. मास्क वाला हा पराठा ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतोय. सोशल मीडियावर याचे फोटो खूप व्हायरल केले जात आहेत. लोकांचा चांगला प्रतिसादही याला मिळतोय.

आलू पराठा, गोबी पराठा, शेजवान पराठा, मिर्च पराठा या सोबतच  यादीत आता एक ‘मास्क’ पराठा सामिल झाला आहे. हा पराठा एकदम मास्कच्या आकाराचा बनवला गेला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर खूप शेअर झाल्यानंतर लोकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

मास्कच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी असा वेगळा संदेश 
शहरात हा पराठा बनवणारे के. एल. कुमार यांचं म्हणणं आहे की, ते लोकांमध्ये मास्क घालण्यासंदर्भात जनजागृती पसरवण्यासाठी एकप्रकारे प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा यासाठीचा छोटासा प्रयत्न आहे. कुमार यांनी सांगितलं की, त्यांचा प्रयत्न आहे की, लोकं त्यांच्या भोजनालयात हा पराठा पाहून घरामध्ये मास्क बाबत चर्चा करतील.

कुमार पुढे म्हणाले, ‘मी मास्कच्या आकाराचा पराठा बनवला आणि जे लोकं माझ्या रेस्टॉरंटमध्ये येतात, त्यांना याद्वारे मास्क घालण्याचा संदेश आम्ही दिला.’ सर्व सरकारी आदेशामुळे  इथं रेस्टॉरंटमध्ये लोकं जेवू शकत नाही, तर पॅक करून घरी घेऊन जावू शकतात.

हेही वाचा : काहीही हं ! लग्नमंडपात नवरी चक्क लॅपटॉप घेऊन आली अन ऑफिसची मिटिंग .....

पराठा दाखवून सांगतात मास्कचं महत्त्व
कुमार कुणालाही जेवण पॅक करण्यापूर्वी हा पराठा दाखवतात. त्यांनी सांगितलं की, त्यांचा उद्देश लोकांना मास्कचं महत्त्व समजावून सांगणं हा आहे. कारण कोरोना व्हायरसच्या घडीला रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मदुराईमध्ये देखील मागील काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतेय. 

हेही वाचा : वजन कमी करण्यासाठी 'या' तांदळाचे करा सेवन...  

महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्यात ठाणे, कल्याण-डोबिंवली आणि आता पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पण पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात आलंय. कारण या सर्व ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पण यासाठी घरात राहणं आणि बाहेर जातांना मास्क घालणं हे सर्व नागरिकांसाठी अनिवार्य आहे. म्हणूनच मदुराईच्या कुमार यांचं मास्क बनविण्याचं काम कौतुकास्पद आहे.हे नक्की.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restaurant Makes Mask Paratha To Raise Awareness About Corona The Unique Dish Is Famous In Eaters