रोहिंग्या मुस्लिमांच्या मदतीला आले रेस्टॉरंट मालक; मोफत वाटतायंत जेवण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 21 October 2020

निर्वासितांचे जीवन जगत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

नवी दिल्ली- आपल्या देशातून परागंदा व्हावे लागलेल्या रोहिंग्या मुस्लीमांना अनेक देशामध्ये शरण घ्यावे लागले आहे. निर्वासितांचे जीवन जगत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात मानवतेच्या दृष्टीकोनातून दिल्लीतील रेस्टॉरंट मालकांनी नवरात्रीच्या निमित्ताने रोंहिग्या मुस्लीमांना मुफ्तमध्ये अन्नाचे वाटप केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशावेळी रेस्टॉरंट मालकांनी स्तुत्व उपक्रम हाती घेतला आहे.

राज ठाकरेंच्या तामिळनाडुतील कट्टर चाहत्याचे निधन

अन्नाला कोणताही धर्म नसतो. ते सर्वांसाठी असते. त्यामुळेच ज्यांना गरज आहे अशांना आम्ही अन्नाचे वाटप करत आहोत. यामुळे ते आपल्या समाजातील लोकांना ज्याप्रकारे आशिर्वाद देतात, त्याचप्रमाणे ते आम्हालाही आशिर्वाद देतील, अशी प्रतिक्रिया एका रेस्टॉरंट मालकाने दिली आहे. 

रोहिंग्यांना अन्न देताना कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळले जात आहे. भारतीयांकडून मिळणाऱ्या या सेवेबद्दल काही शरणार्थींनी प्रतिक्रिया दिली. मी भारत सरकार आणि येथील लोकांचे आभार मानतो. कोरोना सुरु झाल्यापासून आमच्या मदतीसाठी अनेक भारतीय आले आहेत. आम्हाला राशन, कपडे, स्वच्छतेसाठी साबण देण्यात आले आहे, असं एकाने म्हटले. 

कोण आहेत रोंहिग्या मुस्लीम? 

म्यानमारमध्ये जवळपास 8 लाख रोहिंग्या मुस्लिम राहायचे. गेल्या अनेक शतकांपासून म्यानमार त्यांचे घर आहे. पण, म्यानमारचे लोक आणि तेथील सरकार त्यांना आपले नागरिक मानत नाहीत. त्यामुळे रोहिंग्या मुस्लिमांना सरकारकडून मोठ्या अत्याचाराचा सामना करावा लागला आहे. म्यानमारच्या लष्कराने त्यांच्यावर अनंत छळ चावलला आहे. 2017 मध्ये जवळजवळ 7 लाख रोहिंग्या मुस्लिमांनी पलायन केल्याचे सांगितले जाते. अनेक रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये शरण घेतले आहे. शिवाय हजारो रोहिंग्या भारतात आल्याचेही सांगितले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restaurant owners distribute food amongst Rohingya refugees in navaratras