Explainer: आचारसंहिता लागू झाल्यानंतर असे असतात निर्बंध

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज करण्यात आली आहे.
 code of conduct
code of conduct Sakal

Model Code of Conduct Explainer : उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची (Five State Assembly Election 2022 Voting Dates Declared ) घोषणा आज करण्यात आली आहे. त्यानुसार या पाच राज्यांमध्ये आचारसंहिताही (Code Of Conduct) लागू झाली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी काही नियम केले आहेत, त्याला आचारसंहिता असे म्हटले जाते. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमके काय बदल होतात हे आपण जाणून घेणार आहोत. (Code Of Conduct)

 code of conduct
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रूग्णसंख्या 20 हजारांवर

मंत्री-मुख्यमंत्री-आमदारांवर येतात मर्यादा

सरकारचा कोणताही मंत्री, आमदार, अगदी मुख्यमंत्रीही (Ministers) (Chief Minister) (Legislators) निवडणूक प्रक्रियेत सहभागी (Election Process) असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला भेटू शकत नाहीत. सरकारी विमान, वाहने कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या फायद्यासाठी वापरता येत नाहीत. मंत्री-मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून ते कार्यालयापर्यंत शासकीय वाहनाचा वापर केवळ शासकीय कामासाठी करता येतो. याशिवाय राज्य सरकारचा कोणताही मंत्री किंवा कोणताही राजकीय कार्यकर्ता सायरन वाजवणारी गाडी खाजगी असली तरी तिचा वापर करू शकत नाही. (Limitation During Code Of Conducts)

 code of conduct
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस देणार दीर्घकाळ सुरक्षा - भारत बायोटेक

कर्मचाऱ्याची बदलीही करता येत नाही

राज्य आणि केंद्रातील अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करतात. आचारसंहितेत (Code Of Conduct ) सरकार कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली (Transfer) किंवा पदस्थापना करू शकत नाही. कोणत्याही अधिकाऱ्याची बदली किंवा पदस्थापना आवश्यक असल्यास आयोगाची परवानगी (Election Commission) घ्यावी लागते. (Employees cannot be Transfer)

सरकारी पैसा वापरू शकत नाही

आचारसंहितेच्या काळात सरकारी पैसा जाहिरातींसाठी किंवा जनसंपर्कासाठी वापरता येत नाही. अशा जाहिराती आधीच चालू असल्यास, त्या बंद केल्या जातात. नवीन नियोजन, बांधकाम, उद्घाटन किंवा पायाभरणी करता येत नाही. दरम्यान, जर काही काम आधीच सुरू झाले असेल तर ते पुढे चालू ठेवता येते. कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती किंवा साथीचे आजार उद्भवल्यास, अशा वेळी सरकारला काही उपाययोजना करायच्या असतील, तर आधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. (Government Funds Can not Used During Code Of Conduct)

प्रचारावर देखील येतात अनेक निर्बंध ()

मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करता येत नाही. राजकीय पक्ष प्रचारासाठी कितीही वाहने (दुचाकीसह) वापरू शकतात, मात्र आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला रॅली किंवा मिरवणूक काढण्यापूर्वी किंवा निवडणूक सभा घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत डीजे वापरता येत नाही. रॅली काढायची असली तरी ती सकाळी 6 च्या आधी आणि रात्री 10 नंतर घेता येत नाही.

काहीही करण्यापूर्वी आयोगाची मान्यता आवश्यक

आचारसंहितेच्या काळात मंत्री-मुख्यमंत्री-आमदारांवर अनेक निर्बंध लादले जातात. सरकारला काहीही करायचे असेल तर आधी आयोगाला सांगून त्याची मान्यता घ्यावी लागते. केंद्र किंवा राज्याचा कोणताही मंत्री निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला बोलावू शकत नाही.

उल्लंघनावर कठोर कारवाई

कोणत्याही उमेदवाराने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याला प्रचार करण्यास बंदी घातली जाते. तसेच उल्लंघन केल्याबद्दल उमेदवारावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुरुंगात जाण्याचीही तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com