काश्‍मीरमध्ये निर्बंध पुन्हा शिथिल

पीटीआय
Friday, 23 August 2019

इम्रान यांची चिथावणी
काश्‍मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि परदेशातील नागरिकांना चिथावणी देत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे आवाहन केले आहे.

हैदराबाद - काश्‍मीर खोऱ्यातील सद्यःस्थिती लक्षात घेऊन आज अनेक भागांतील संचारबंदी काहीशी शिथिल करण्यात आली होती. मोबाईल, इंटरनेटसेवा मात्र मागील अठरा दिवसांपासून ठप्पच आहे. लोकांचे दैनंदिन व्यवहार आणि सार्वजनिक वाहतूक सुरू झाली असली, तरीसुद्धा व्यापारपेठा मात्र आजही बंदच होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मात्र काश्‍मीर खोऱ्यातील लष्करास आताच माघारी बोलाविण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे.

काश्‍मीर खोऱ्यामध्ये सध्या शांतता असून, आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण असल्याने विद्यार्थी शाळांमध्ये येणे टाळत आहेत. 

इम्रान यांची चिथावणी
काश्‍मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि परदेशातील नागरिकांना चिथावणी देत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे आवाहन केले आहे. 

काश्‍मीरप्रश्‍नी अनेक देशांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली असून, भारत ही ऑफर स्वीकारत नाही तोपर्यंत मुद्दा पुढे सरकणार नाही.
- मोहंमद फैजल, प्रवक्ते, पाक परराष्ट्र मंत्रालय

सध्या देशात जे काही सुरू आहे, तो लोकशाहीचा भाग नक्कीच नाही. काश्‍मीरमध्ये काहीतरी गंभीर घडते आहे.
- गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

जम्मू-काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या दाव्यावर आपण ठाम आहोत. लष्कराने चौकशी समिती नेमल्यावर मी पुरावे देईन.
- शेहला रशिद, राजकीय कार्यकर्त्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions in Kashmir relax again