बारावीचा निकाल ठराविक तारखेलाच

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिलला झाली असली तरी त्यामुळे परीक्षेच्या निकालास विलंब होणार नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, या कामासाठी अधिक शिक्षकांना पाठविण्याची सूचना शाळांना केली असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पेपरफुटीमुळे बारावीच्या अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेण्यात आली.

Web Title: The results of HSC result at the specified date