Video : निवृत्त न्यायाधीशाने केली सुनेला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

राव यांची सून सिंधू शर्मा ही गेले काही दिवस हुंडा व घरगुती अत्याचाराचा बळी ठरत आहे. कुटुंबियांविरोधात तिने याचिकाही दाखल केली आहे.

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नूटी राममोहन राव यांच्या घरातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. राव व त्यांचे कुटुंबिय त्यांच्या सूनेला मारहाण करत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्यामुळे न्यायाधीशाच्या घरातच असा अत्याचार बघून सोशल मीडियावर राव यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

राव यांची सून सिंधू शर्मा ही गेले काही दिवस हुंडा व घरगुती अत्याचाराचा बळी ठरत आहे. कुटुंबियांविरोधात तिने याचिकाही दाखल केली आहे. ही याचिका व तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात आहे. पण सिंधू तक्रार मागे घेत नसल्याने गेले काही दिवस तिला घरात नवऱ्यासह इतरजण ही मारहाण करत आहेत, असे तिने सांगितले. 'माझ्याकडे आणखी काही सीसीटीव्ही फुटेज आहेत. ज्यात मला घरचे मारहाण करत आहेत. गरज पडल्यास ते ही व्हिडिओ मी व्हायरल करेन,' असे सिंधूने सांगितले आहे.  

sindhu

सिंधूसह तिच्या वडिलांवरही तक्रार मागे घेण्यास दबाव टाकला जात आहे. तसेच राव यांनी सिंधूला तक्रार मागे घेण्यासाठी व साक्षल फिरवण्यासाठी पैशांची ऑफरही दिली आहे. सिंधूने 26 ऑगस्टला पती वशिष्ठ, सासरे राव व सासू लक्ष्मी यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. 'पूर्वी मी या त्रासाकडे दुर्लक्ष करायचे, पण मला 2 मुली झाल्यानंतर सासरच्यांकडून होणारी मारहाण व मानसिक त्रास आणखी वाढला,' असे तिने सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Madras HC Judge s Daughter in Law Alleges Pressure to Withdraw Case