निवृत्त प्राध्यापिकेची अशीही दानशूरता; तब्बल 97 लाख रुपये दान

पीटीआय
रविवार, 1 डिसेंबर 2019

- बंगालमधील निवृत्त प्राध्यापिकेची दानशूरता

कोलकता : आपण 2002 पासून पश्‍चिम बंगालमधील विविध शैक्षणिक संस्थांना एकूण 97 लाख रुपयांची देणगी दिली आहे, असा दावा येथील एका निवृत्त प्राध्यापिकेने केला आहे. चित्रलेखा मलिक असे या प्राध्यापिकेचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

चित्रलेखा मलिक या कोलकत्यात एकट्याच राहतात. येथील व्हिक्‍टोरिया संस्थेतून संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या आहेत. संशोधनासाठी आर्थिक साह्याची आवश्‍यकता असणाऱ्यांना त्या मदत करतात. त्यांना महिन्याला 50 हजारांहून अधिक निवृत्तिवेतन मिळते. त्यांनी जादवपूर विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. त्यामुळे 97 लाखांपैकी 50 लाख रुपये त्यांनी गेल्याच वर्षी याच विद्यापीठाला त्यांचे मार्गदर्शक विधुभूषण भट्टाचार्य यांच्या स्मरणार्थ देणगी म्हणून दिले.

सावधान : नव्या नियमांमुळे आजपासून खिशावर येणार ताण

तसेच, मार्गदर्शकांच्या पत्नीच्या स्मरणार्थही त्यांनी शिष्यवृत्ती सुरू करून त्यासाठी सहा लाख रुपये दिले आहेत. मलिक यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ 31 लाख रुपयांची देणगी भारतीय संशोधन संस्थेला दिले आहेत. उर्वरित रक्कम त्यांनी 2002 पासून विविध संस्थांना गरजेनुसार दिले आहेत. साधे जीवन जगण्यासाठी अधिक पैसे लागत नाहीत, असे मलिक यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired West Bengal professor donated 97 lakhs to educational institutes since 2002

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: