बेळगाव : विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक अधिकारी नियुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणूक निमित्त विधानसभा मतदार संघनिहाय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची (रिटर्निंग ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. तसेच व्हॉट्‌सऍप आणि टोल-फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा 27 मार्चला झाली. 29 मार्चला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. जिल्हास्तरीय निवडणूक समितीची स्थापना केली असून, जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. त्याचे अध्यक्ष आहेत. 12 जणांची समिती आहे. जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचीही समिती स्थापली आहे. 18 जणांची समिती आहे. विधानसभा मतदार संघनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 18 विधानसभा मतदार संघनिहाय अधिकारी आहे. तसेच विधानसभा मतदार संघनिहाय सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांची संख्या 18 आहे. मतदार संघनिहाय भरारी पथकेही स्थापली आहेत. 

व्हॉट्‌सऍप, टोल फ्री क्रमांक जारी 
विधानसभा निवडणुकीबाबत माहिती, तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक निवडणूक विभागाने जारी केले आहे. 18004250134 या क्रमांकावर संपर्क तक्रार नोंदविता येईल. व्हॉट्‌सऍप कॅमांक जारी केला असून, 918277375850 हा क्रमांक आहे. तसेच belgavidchelpline@gmail.com या इमेलवर माहिती किंवा तक्रार दाखल करता येईल, असे निवडणूक विभागाने कळविले आहे. 

Web Title: returning officer appointed for karnataka election