जेव्हा राहुल गांधी साध्या हॉटेलात डोसा खातात...(व्हिडीओ)

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

दिल्लीत परतताना पाटण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डोशाचा आस्वाद घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल, प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह त्यांच्याबरोबर होते.

पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाटण्यात एका मानहानीच्या खटल्यात जामीन मिळाला. तिथून दिल्लीत परतताना पाटण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डोशाचा आस्वाद घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल, प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह त्यांच्याबरोबर होते. यावेळी काही लोकांनी त्यांच्याबरोबर फोटोही काढले हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

राहुल गांधी यांच्याशी यावेळी काही लहान मुलांनी संवाद साधला. राहुल हे सर्वांशी अत्यंत प्रेमाने बोलले. काही मुलांना राहुल यांच्याशी संवाद साधायची इच्छा होती राहुल यांनी त्यांना देखील वेळ दिला, असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केलं आहे.

दरम्यान राहुल गांधींच्या डोसा खाण्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्या डोसा खाण्यावरून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा चालू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Returning from Patna court, Rahul Gandhi drops in at restaurant for a meal