मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस

अमृत वेताळ
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

बेळगाव : खंडणीसाठी वाघवडे (ता. बेळगाव) येथील एका शिक्षकाच्या मुलाचे मित्रांनीच अपहरण केल्याचे नाट्यमय प्रकरण उघडकीस आले आहे. गावकऱ्यांनीच प्रकरणाचा उलगडा केला असून दोघा संशयिताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

गावातील एका शिक्षकाच्या मुलाचे सोमवारी (ता.20) अज्ञातांनी अपहरण केले होते. रात्री डेरीला दुध देण्यासाठी गेलेला आपला मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत घरी न परतल्याने कुटूंबियांना त्याचा शोध चालविला होता. गावकऱ्यांनी आज सकाळी एका तरुणाला हेरून त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने सर्व हकिकत गावकऱ्यांना सांगितली.

अपहृत तरुणाला गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील उसाच्या फडात बांधून ठेवल्याचे सांगितले. त्या ठिकाणी गावकरी येत असल्याचे समजताच अपहृत तरुणाला सोडून देऊन सशयीतानी घटनास्थळावरून पलायन केले. काही वेळानंतर दोघांना गावकऱ्यांनी पकडून ठेवले होते. अपहृत तरुणाचे वडील शिक्षक असून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा कट होता का? अशी चर्चा गावकऱ्यात सुरू होती. दोघांनाही बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात तक्रार झाल्यानंतर पोलिस तपासातच खाती माहीत बाहेर पडणार आहे. त्यामुळे आज दिवभर सर्वत्र या नाट्यमय अपहरणाचीच चर्चा सुरू होती.

Web Title: Reveal the dramatic case of kidnappaing by friends