कुलभूषण जाधव यांच्या मातेस 'व्हिसा'च्या प्रस्तावावर विचार:पाकिस्तान

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

जाधव यांना व्हिसा अर्ज फेटाळण्यात आल्याप्रकरणी बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र विभाग प्रमुख सरताज अझीझ यांच्यावर कडक टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून हे संकेत देण्यात आले आहेत

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने एकतर्फी मृत्युदंडाची शिक्षा सुनाविलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आईस (अंवंतिका जाधव) यांना व्हिसा देण्यासंदर्भातील अर्जावर "विचार करत' असल्याचे संकेत पाकिस्तानकडून आज (गुरुवार) देण्यात आले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्‍ते नफीस झकारिया यांनी यासंदर्भातील माहिती दिली. जाधव यांना व्हिसा अर्ज फेटाळण्यात आल्याप्रकरणी बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र विभाग प्रमुख सरताज अझीझ यांच्यावर कडक टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून हे संकेत देण्यात आले आहेत. याचबरोबर, व्हिसासाठी अझीझ यांच्याकडे शिफारस करणे हे "राजनैतिक संकेतां'विरोधात असल्याची तीव्र प्रतिक्रियाही पाककडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

जाधव यांना गेल्या वर्षी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने एकतर्फी फाशी सुनावली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यावर स्थगिती आणत पाकिस्तानला चपराक लगावली होती. 

Web Title: 'Reviewing Jadhav's mother visa application,' says Pakistan