वाहनांमध्ये बसविणार 'आरएफआयडी' टॅग

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - वाहननिर्मिती कंपन्यांनी नव्या वाहनांमध्ये डिजिटल टॅग बसविण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. यामुळे टोल नाक्‍यांवर वाहनांना न थांबविता ऑनलाइन टोलवसुली होणार आहे.

डिजिटल अर्थव्यवस्थेकडे देशाला नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. रस्ते व वाहतूक मंत्रालयाने वाहननिर्मिती कंपन्यांना नव्या वाहनांमध्ये "रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन' (आरएफआयडी) सुविधा देण्याची सूचना केली आहे. "आरएफआयडी' नव्या वाहनांमध्ये बसविल्यानंतर टोलवसुली डिजिटल होणार आहे. यामुळे टोल नाक्‍यांवर वाहनांची गर्दी कमी होईल. वाहनांना टोल नाक्‍यावर थांबण्याची यामुळे गरज उरणार नाही.

सर्व व्यवहार डिजिटल करावेत
केंद्र सरकारमधील सर्व विभाग, सरकारी संस्था, सरकारी कंपन्यांनी डिजिटलचियी माध्यमातून व्यवहार करावेत, असे निर्देश सरकारने दिले आहेत. इंटरनेट बॅंकिंग, कार्ड, आधारशी निगडित व्यवस्थेद्वारे केवळ व्यवहार करावेत, अशी माहिती आर्थिक कामकाज सचिव शक्तिकांत दास यांनी दिली.

Web Title: rfid tag fit in vehical