ऋषी कपूर यांच्या घराचे होणार संग्रहालय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

इस्लामाबाद : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पेशावरमधील घराचे संग्रहालय करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. यासंदर्भात ऋषी कपूर यांनीच विनंती केली होती, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले. 

भारतीय पत्रकारांशी बोलताना शाह म्हणाले की, या संदर्भात ऋषी कपूर यांनी दूरध्वनी केला होता. पेशावरमधील आपल्या घराचे संग्रहालय करावे किंवा त्याचे इन्स्टिट्यूट करावी, अशी विनंती कपूर यांनी केली होती. त्यांची ही विनंती आम्ही मान्य केली आहे. पाकिस्तानचे अंतर्गतमंत्री शेहयार खान अफ्रिदी म्हणाले की, पेशावरमधील कपूर कुटुंबाच्या घराचे संग्रहालय करावे आणि आम्ही त्यांची मागणी मान्य करीत त्याला प्रतिसाद दिला आहे.

प्रांतिक सरकार याबाबत काम करीत असून, लवकरच या घराचे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात येईल, असे अफ्रिदी म्हणाले. दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी पेशावरमध्ये झाला होता. 1950 ते 60 च्या दशकात राज कपूर यांनी अत्यंत दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली होती. 1947 मध्ये विभाजनानंतर कपूर कुटुंबाने पेशावर सोडले होते.

Web Title: Rishi Kapoors house will be a museum in Pakistan