पुढच्या महिन्यात होतं बहीणीचं लग्न; काश्मीरच्या बॉम्बस्फोटात जवान शहीद

नौदलासोबत जवळचं नातं असलेल्या या कुटुंबातील सदस्यांनी मागील अनेक वर्ष नौदालाची चोख सेवा बजावली आहे
पुढच्या महिन्यात होतं बहीणीचं लग्न; काश्मीरच्या बॉम्बस्फोटात जवान शहीद
Summary

नौदलासोबत जवळचं नातं असलेल्या या कुटुंबातील सदस्यांनी मागील अनेक वर्ष नौदालाची चोख सेवा बजावली आहे

पुढच्या महिन्यात बहिणीचे लग्न आहे. लग्नाला जायच्या तयारीत लेफ्टनंट भावाने रजेसाठी अर्जही केला होता. पंरतु नियतीला हे मान्य नसावे. घरी जाण्याआधीच कश्मीर येथे झालेल्या एका बॉम्बस्फोटात ऋषी रंजन हे शहीद झाले. शनिवारी झालेल्या या ब्लास्टमध्ये त्यांच्यासोबत आणखी एक जवानही शहीद झाला. या स्फोटात शहीद झालेले लेफ्टनंट ऋषि रंजन उर्फ ऋषीकु्मार हे मुळचे बेगूसरायचे रहिवासी होते. शहरातील जीडी महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला पिपरा रोडला त्यांचे कुटुंब राहत होते. त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी देशेसेवेच काम केले आहे. देशसेवा आणि रजंन कुटुंब असं जणू एक सुत्रच बनल होतं. नौदलासोबत जवळचं नातं असलेल्या या कुटुंबातील सदस्यांनी मागील अनेक वर्ष नौदालाची चोख सेवा बजावली आहे आणि आजही बजावत आहेत.

पुढच्या महिन्यात होतं बहीणीचं लग्न; काश्मीरच्या बॉम्बस्फोटात जवान शहीद
ब्रिटन दौऱ्यानंतर PM मोदी घेणार कोरोनासंदर्भात तातडीची बैठक

ऋषी रंजन हे केवळ २४ वर्षाचे होते. त्यांचे मामा सुदर्शन सिंह यांनी सांगितले राजीव रंजन यांचा ऋषी हा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणीही आहेत. यातील मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून पती आणि ती नौदलात कार्यरत आहेत. सध्या ते आसाम येथे देशसेवा बजावत आहेत. छोट्या बहिणीचे लग्न पुढील महिन्यात होते. मात्र या घटनेने रंजन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपला तरणाताठ मुलगा देशसेवा करताना शहीद झाला असल्याते कळताच कुटुंबातील लोकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.

पुढच्या महिन्यात होतं बहीणीचं लग्न; काश्मीरच्या बॉम्बस्फोटात जवान शहीद
WHO च्या आधी भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता

ऋषी यांचे वडील राजीव हे मूळचे लखीसराय जिल्ह्यातील पिपरिया येथील रहिवासी आहेत. मागील ४० वर्षापासून ते बेगूसरायमध्ये राहतात. तेथेच त्यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. ही घटनेची माहिती मिळताच, शनिवारी रात्री परिसरातील लोकांनी घराजवळ गर्दी केली. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी रंजन यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबियांना कोणत्याही अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com