भारतीय जवानांनी 'हिज्बूल मुजाहिद्दीन'च्या या कमांडरला संपवले!

पीटीआय
Wednesday, 6 May 2020

जम्मू काश्मीरमधील शोधमोहिमेअंर्गत भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. हिज्बूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर रियाझ नायकू याचा बुधवारी खात्मा करण्यात आला. यापूर्वी अनेकदा तो जाळ्यात अडकल्यानंतर निसटण्यात यशस्वी ठरला होता. मात्र यावेळी लष्कराने त्याचा शेवट केला आहे.  जम्मू-काश्मीरमधील अवंतीपुरा येथील बेगपोरा परिसरात अन्य काही दहतवाद्यांसोबत रियाझ असल्याची खबर सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती.

जम्मू काश्मीरमधील शोधमोहिमेअंर्गत भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. हिज्बूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर रियाझ नायकू याचा बुधवारी खात्मा करण्यात आला. यापूर्वी अनेकदा तो जाळ्यात अडकल्यानंतर निसटण्यात यशस्वी ठरला होता. मात्र यावेळी लष्कराने त्याचा शेवट केला आहे. जम्मू-काश्मीरमधील अवंतीपुरा येथील बेगपोरा परिसरात अन्य काही दहतवाद्यांसोबत रियाझ असल्याची खबर सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मंगळवारी रात्री उशीराने लष्कराने शोधमोहिम सुरु केली होती. स्थानिक पोलिस, लष्करी जवान आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त तुकडीने ही मोहिम फत्तेह केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीर परिसरातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली होती. जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारीपासून दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरु होती. यात हिज्बूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर रियाझ नायकू याच्यासह अन्य दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

जम्मू काश्मीरच्या काही भागातील इंटरनेट सेवा पुन्हा स्थगित

काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत झालेल्या अनेक हल्ल्यात रियाझ नायकूचा हात होता. काश्मीर खोऱ्यातील लोकांना दहशतवादी संघटनेमध्ये सामील करण्याचे कामही तो करायचा. त्याचा खात्मा झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील दहतवादी संघटनेतील भरतीलाच सुरक्षा रक्षकांनी सुरुंग लावल्याचे विजय कुमार यांनी म्हटले आहे.  

...म्हणून सोनिया गांधींनी मानले शेतकऱ्यांचे आभार!

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कुख्यात कमांडर बुरहान वानी याचा लष्कराने खात्मा केल्यानंतर या संघटनेच्या कमांडरची धूरा हा रियाझ नायकूकडे आली होती. काश्मीर खोऱ्यातील तरुणांची डोकी भडकवण्याचे काम करत त्यांना दहशतावीद संघटनेत सामील करुन घेण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी तो सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: riyaz naikoo killed in encounter terrorist jammu kashmir security forces