मोठा दिलासा! लालू यादव आता सिंगापूरला जाऊ शकणार; कोर्टानं दिली 'इतक्या' दिवसांची परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad Yadav

लालू यादव अनेक आजारांनी त्रस्त आहेत. त्यांना किडनी, फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग आहे.

मोठा दिलासा! लालू यादव आता सिंगापूरला जाऊ शकणार; कोर्टानं दिली 'इतक्या' दिवसांची परवानगी

नवी दिल्ली : IRCTC घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना उपचारासाठी सिंगापूरला जाण्याची परवानगी देण्यात आलीय. लालू यादव यांनी उपचारासाठी सिंगापूरला (Singapore) जाण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर राऊस एव्हेन्यू कोर्टानं (Rouse Avenue Court) आज म्हणजेच, बुधवारी सुनावणी केली. न्यायालयानं लालूप्रसाद यादव यांना 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान सिंगापूरला जाण्याची परवानगी दिलीय. राजद सुप्रीमो लालू यादव किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला जाणार आहेत. किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर लालू कुटुंबीयांनी हा निर्णय घेतलाय.

हेही वाचा: VIDEO : खुद्द नितीश कुमारांनीच तेजस्वीला 'मुख्यमंत्री' म्हणून स्वीकारलं? जाणून घ्या नेमकं काय घडलं

लालू यादव अनेक आजारांनी त्रस्त आहेत. त्यांना किडनी, फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग आहे. मधुमेह आणि रक्तदाबाचाही त्रास होत आहे. लालूंच्या दोन्ही किडन्या 75 टक्क्यांहून अधिक निकामी झाल्या आहेत. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं लालूप्रसाद यादव यांना त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले होते. लालूंनी 13 सप्टेंबर रोजी कोर्टात अर्ज दाखल करून पासपोर्ट परत करण्याची विनंती केली होती.

हेही वाचा: Congress : फक्त 'पीएफआय'वरच का? RSS वरही बंदी घाला; काँग्रेस खासदाराची मागणी

लालूंच्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलानं न्यायालयाला सांगितलं होतं की, सिंगापूरच्या डॉक्टरांनी लालू यादव यांना 24 सप्टेंबर रोजी तपासासाठी तारीख दिली आहे, त्यामुळं त्यापूर्वी त्यांना सिंगापूर गाठावं लागणार. यामुळं लालू यादव यांचा पासपोर्ट लवकरात लवकर परत करावा, अशी मागणी केली होती.