'भाजपने मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती'; कोण म्हणतंय पाहा!

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 25 November 2019

काही काळापूर्वी भाजपने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. ती माझ्या तत्त्वांना न पटल्याने मी ती नाकारली.​

पाटणा : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राजकीय प्रलोभनं दाखवत आपल्यासोबत घेतले, आणि राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, भाजपने ही खेळी आपल्यासोबतही खेळली होती, असा दावा एका नेत्याने केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपने मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, मी ती तत्त्वांच्या आधारावर नाकारली, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे. विधानसभेच्या आवारात असलेल्या राजदच्या राज्य कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा दावा केला. 

ते म्हणाले की, काही काळापूर्वी भाजपने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. ती माझ्या तत्त्वांना न पटल्याने मी ती नाकारली. मी त्या वेळी ती ऑफर स्वीकारली असती आणि माझ्या पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड केली असती, तर आज बिहारचा मुख्यमंत्री राजदचा असता.

- का होतोय #GoBackModi हॅशटॅग ट्रेंड?

भाजपचे नेते माझ्याकडे सत्तास्थापनेची एक ऑफर घेऊन आले होते. ज्यानुसार राजदला मुख्यमंत्रिपद आणि भाजपला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार होते. मी त्यांची ऑफर स्वीकारली असती, तर भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दूर करत आमच्यासोबत सरकार स्थापन केले असते. 

- महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन.. 'आम्ही 162' कार्यक्रमातील A टू Z मुद्दे...

तेजस्वी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. 2017 मध्ये नितीशकुमार यांनी राजदसोबतची आघाडी मोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते.

- भाजपला बसणार मोठा झटका; अजित पवार द्विधा मनस्थितीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RJD leader Tejaswi Yadav attacked BJP on political crisis in Maharashtra