'राहुल हे चांगले पंतप्रधान बनतील'

'राहुल हे चांगले पंतप्रधान बनतील'

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चांगले पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण आहेत, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

"राहुल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजप कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, राहुल यांच्यात चांगले पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सर्व गुण आहेत. त्यांच्या नेतृत्वाबाबत कधीही शंका नव्हती. त्यांच्याविरोधात मोठी प्रचार मोहीम भाजपने राबविली असतानाही त्यांनी जनतेची मने जिंकली आहेत,' असे तेजस्वी यादव यांनी "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व कॉंग्रेसने करावे, असे मतही तेजस्वी यांनी व्यक्त केले आहे, अशी आघाडी झाल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार मात्र सर्वांनुमतेच निवडणुकीनंतर ठरवला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com