मडगावातील कपड्याच्या शोरूममध्ये चोरी 

मडगावातील कपड्याच्या शोरूममध्ये चोरी 

गोवा : मडगावात भर शहरामध्ये असलेल्या लिली गार्मेंटस् शोरूमच्या शटरची कुलूपे तोडून चोरट्यांनी सुमारे वीस हजारांची रोख रक्कम पळविली. शोरूममधील रेडिमेड कपडे अस्तावस्त फेकण्यात आले होती. ही घटना काल रात्री घडली. शोरूमचे मालक आज सकाळी दुकान उघडण्यास आले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला.

ठसे तज्ज्ञ पोलिसांना शोरूमधील काऊंटरवर चोरट्यांच्या बोटांचे ठसे सापडले आहेत. श्वान पथकाच्या सहाय्याने शोध घेण्यात आला मात्र काही अंतरापर्यंत जाऊन श्वान थांबले. गेल्या आठवड्यात चोरट्यांनी वास्को येथील एका मोबाईल शोरूमचे शटर वाकवून सुमारे 35 लाख रुपयांचे मोबाईल्स चोरले होते. त्यामुळे शटर तोडून चोरी करणारी टोळी गोव्यात कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com