दरोड्याच्या उद्देशाने हल्ला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

भामने (ता. मावळ) : चोरीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील भामने गावापासून एक किलोमीटर अंतरावरील फाले कुटुंबियांच्या घरात ही घटना घडली.

भामने (ता. मावळ) : चोरीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील भामने गावापासून एक किलोमीटर अंतरावरील फाले कुटुंबियांच्या घरात ही घटना घडली.

फाले कुटुंबियांच्या भामने गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या घरात होते. आज (मंगळवार) पहाटे दीड ते दोनच्या सुमारास काही दरोडेखोर फाले कुटुंबियांच्या घरात घुसले. त्यावेळी घरात सगळेजण झोपलेले होते. दरोडेखोरांनी झोपलेल्या अवस्थेत असलेल्या नथु विठोबा फाले (वय 65), छबाबाई नथु फाले (वय 60), अत्रिनंदन नथु फाले (वय 35) यांना टीकाव आणि लोखंडी रॉडने डोक्‍यावर आणि पोटावर जबर मारहाण केली. त्यामध्ये या तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शेजारच्या खोलीत असलेल्या अत्रिनंदन यांच्या पत्नी तेजश्री यांच्याकडे दरोडेखोर आले. तेजश्रीच्या गळ्यातील आणि कानातील दागिने दरोडेखोरांनी ओरबडले. त्यात त्या जखमी झाल्या. मात्र, धाडस दाखवत त्यांनी दरोडेखोरांपासून सुटका करून घेत तेथून शंभर मीटर अंतरावर असलेल्या शेजारच्या घरात मदतीसाठी याचना केली. शेजारच्या घरातील लोक बाहेर आल्याचे पाहत दरोडेखोरांनी पळ काढला. या घटनेत अत्रिनंदन यांची कन्या इश्‍वरी हिच्या कानाला आणि डोक्‍याला किरकोळ जखम झाली. तर अत्रिनंदन यांची अनुश्री नावाची अन्य कन्या या हल्ल्यातून बचावली.

या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Robbery intention attack : Three members of same family killed