बेळगावात दरोड्याच्या तयारीत असलेली आणखी एक टोळी जेरबंद

अमृत वेताळ
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

बेळगाव : शहापूर पोलिसांनी दरोड्याचा तयारीत असलेल्या पाच जणांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच खडेबाजार पोलिसांना दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या आणखी एका टोळीला मध्यरात्री साडेबारा वाजता जेरबंद करण्यात यश आले. 

गणेश भीमा हाजगोळकर (वय 20, रा. बुरुड गल्ली), राकेश रमेश क्षीरसागर (वय 19, रा. रेल्वे कॉर्ट्सर), राजेश मारुती सावन्त (वय 28, रा. कामत गल्ली), सादिक अत्तरहुसेन तडकोड (वय 28, रा. न्यू गांधीनगर), शिवराज जयवंत मोहिते (वय 24, रा. केरकळबाग) अशी अटकेतील सशयत आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता, लोखंडी रॉड, प्लास्टिक दोरी, मिरचीपूड जप्त केली आहे. सरदार्स हायस्कूल मैदानावरील स्टेडियम नजीक काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत बसले आहेत, अशी माहिती खडेबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यू. एच. सतेन्हल्ली यांना मिळाली होती. त्यांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याठिकाणी धाड टाकून वरील पाच जणांना अटक केली.

जुन्या पिबी रोडवरील बल्लारी नाल्यानजीक दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केल्यानंतर पुन्हा आणखी एका टोळीला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Robbery Preparation Another gang Arrested in Belgaum